बांगलादेश हिंसाचार प्रकरणी कोलकातात हिंदू आक्रमक!

09 Aug 2024 12:59:33

Hindu Protest in West Bengal

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Protest in West Bengal) 
बांगलादेशात हिंदूंवर, मंदिरांवर होत असलेल्या हल्लांच्या निषेधार्थ कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू जागरण मंच आणि सकल हिंदू समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. सियालदह स्थानक परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी हिंदू बांधवांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आवाज उठवला. त्यानंतर बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर रास्ता रोको करून निदर्शने सुरू केली. हिंदूंच्या अत्याचारावर विचारवंत गप्प का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

बांगालदेशात आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशी हिंदूंना टार्गेट केले जात आहे. हिंदूंच्या घरावर कट्टरपंथीयांकडून हल्ले केले जात आहेत. हिंदूंना आपल्या प्राणांसह जमिनी आणि मंदिरेही गमवावी लागत आहेत. बांगलादेशातील एकूण ६४ जिल्ह्यातील हिंदू व अन्य अल्पसंख्याक सध्या मृत्यूच्या छायेत जीवन कंठत असल्याचे समोर आले आहे. आरक्षणविरोधाच्या नावाखाली सुरु झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन इस्लामी कट्टरतावाद्यांच्या हाती गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Powered By Sangraha 9.0