मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून वायूसेनेच्या विमानाने त्यांना शनिवारी नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली. नेपाळमधील तानाहुन इथे हा अपघात झाला असून या बसमध्ये एकूण ४० लोकं असल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, यात जळगाव जिल्ह्यातील २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
हे वाचलंत का? - शिवसेना भवनासमोर उबाठा गटाचं निषेध आंदोलन!
दरम्यान, याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सांगितले. शनिवारी वायुसेनेच्या विमानाने या २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार असून तिथून ते कुटुंबियांकडे पोहोचविण्यात येणार आहेत.