पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात आज दोन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना तब्बल ३ हजार रुपये मिळणार आहेत. यानिमित्ताने पुण्यात एक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीमध्ये आज (शनिवार, १७ ऑगस्ट) राज्यस्तकीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडले. दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
हे वाचलंत का? - 'सामना'मध्ये वाट्टेल ते लिहून शाई वाया घालवू नका!
१४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत जवळपास ९६ लाख ३५ हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ प्राप्त झाला असून उर्वरित महिलांच्या खात्यात आज ३ हजार रुपये जमा होणार आहेत.