वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी

15 Aug 2024 16:34:29
medical education bharat government


नवी दिल्ली :          स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, येत्या ५ वर्षात वैद्यकीय अभ्यासासाठी ७५ हजार नव्या जागा निर्माण केल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरील भाषणात केली आहे. विकसित भारतासोबतच आपल्याला निरोगी भारताची निर्मिती करायची आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


हे वाचलंत का? -        आता भारतीय रेल्वेचा आरामदायी प्रवास होणार; प्रिमियम दर्जाच्या वस्तूंचा वापर


दरम्यान, देशाच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या १० वर्षांत सरकार वैद्यकीय जागांची संख्या सुमारे एक लाखांपर्यंत वाढविली आहे. दरवर्षी २५ हजार तरुण वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात. ते अशा अशा देशांमध्ये जातात हे ऐकून मला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही विकसित भारताच्या पहिल्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून पोषण अभियान सुरू केले आहे. तसेच, सरकारने ठरवले आहे की, पुढील पाच वर्षांत मेडिकल लाईनमध्ये ७५ हजार नवीन जागा निर्माण केल्या जातील. विकसित भारत २०४७ अंतर्गत पूर्ततेसाठी कठोर परिश्रम सुरू, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन करताना म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0