आता भारतीय रेल्वेचा आरामदायी प्रवास होणार; प्रिमियम दर्जाच्या वस्तूंचा वापर
15-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी नवनवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यातच आता आता रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार असून भारतीय रेल्वेने प्रिमियम दर्जाच्या बेडशीट्स आणि ब्लँकेट्स लाँच केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेने नवीन प्रीमियम अल्ट्रा सॉफ्ट लिनन सादर केल्याची माहिती उत्तर रेल्वेने दिली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवास करताना आता अधिक आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. रेल्वेने जाहीर केले की, प्रवाशांना आता अल्ट्रा-सॉफ्ट, श्वास घेण्यायोग्य आणि दीर्घकाळ टिकणारे तागाचे कपडे दिले जातील. सध्या, रेल्वे एसी क्लासच्या प्रवाशांना बेड आणि ब्लँकेट पुरवते. याआधी रेल्वे प्रशासनाकडे आरामदायक नसतात आणि श्वास घेण्यास त्रास अशी तक्रार अनेकदा प्रवासी करताना दिसून आले आहे.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वेने भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या सहकार्याने संपूर्ण संशोधन आणि विकासानंतर हे तागाचे डिझाइन केले आहे. हे जगप्रसिद्ध ब्रँडद्वारे डिझाइन केलेले असून जे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आनंददायी प्रवास अनुभूती देणार आहे. दि. १४ ऑगस्टपासून रांची राजधानी एक्स्प्रेसमध्ये या लिनेनचा वापर सुरू झाला असून दि. १७ ऑगस्टपासून तो बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसमध्येही सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.