मुंबई : तुम्ही पुढचे १०० वर्षे विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी तयार राहा, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरून आता राणेंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले की, "पंतप्रधानांनी बहुमत गमावलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. पण यांचा मालक महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना ते बहुमताचं सरकार होतं का? आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या हिमतीवर सरकार आणलेलं नाही. ते स्वत:च्या ताकदीवर १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत. उद्धव ठाकरे हल्लीच दिल्लीला गेले आणि महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री करा यासाठी काँग्रेस नेत्यांचे पाय धरून आलेत."
हे वाचलंत का? - ठाकरे प्रचार प्रमुख, पण CMपदाचा चेहरा नाही!
"आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचं सरकार भक्कम आहे. त्यामुळे त्यांना नावं ठेवू नका. येणाऱ्या ५ वर्षांत एनडीएच्या घटक पक्षांना सोबत घेऊन भारताला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीकोणातून सगळे निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही पुढचे १०० वर्षे विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी तयार राहा," असे नितेश राणे म्हणाले.