ठाकरे प्रचार प्रमुख, पण CMपदाचा चेहरा नाही!

    15-Aug-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबाबदचे आदेश दिल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही.
 
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी तीन दिवसीय दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवावा, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीवारी केल्याचे बोलले जात होते. शिवाय संजय राऊतांनी उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार, असे वक्तव्य केले होते.
 
हे वाचलंत का? -  गेल्या दोन वर्षांत राज्याने चौफेर प्रगती केली! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन
 
त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूकांचा प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतू, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पुढल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयाच्या आवारात होणाऱ्या सोहळ्यात महाविकास आघाडीचे ठाकरे २ सरकारचे मुख्यमंत्री अभिमानाने तिरंगा फडकवतील. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेणार आहोत," असे ते म्हणाले.