मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या रक्षाबंधनाला महाराष्ट्रातील बहिणींना 'खोटं न बोलण्याची' ओवाळणी द्यावी, असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी लगावला आहे. तसेच मविआतील नेते बहिणींची दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "राज्यातील माय बहिणींना महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली आहे. पण महाविकास आघाडीने या योजनेचा मोठा धसका घेतलेला दिसत आहे. त्यामुळे ते पैसे परत घेण्याबाबत खोटं बोलून दिशाभूल करत आहेत."
हे वाचलंत का? - "माझा करेक्ट कार्यक्रम फक्त..."; छगन भुजबळांचं जरांगेंना चोख प्रत्युत्तर
"महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना माझी एक विनंती आहे, की खोटं न बोलण्याची, खोटा नरेटीव्ह न पसरवण्याची आणि महाराष्ट्राची दिशाभूल न करण्याची ओवाळणी या रक्षाबंधनाला तुम्हीही द्या," असा सल्ला केशव उपाध्येंनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.