मेटा एआय वापरासाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ

    01-Aug-2024
Total Views |
meta ai used in indian market


नवी दिल्ली :        आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग असलेल्या मेटा(Meta) एआयसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे, असे आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉटबद्दल सोशल मीडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी सुसान ली यांनी सांगितले आहे. आम्ही व्हॉट्सॲपवर टिकवून ठेवण्याच्या आणि प्रतिबद्धतेच्या संदर्भात विशेषत: आशादायक चिन्हे पाहत आहोत, जे मेटा एआय वापरासाठी भारत आमची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.


हे वाचलंत का? -   एका वर्षात ३९.३ दशलक्ष लोकांनी केली उपासमारीतून सुटका!


दरम्यान, व्यवसायिक कंपनी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एआय सेवा कशी वापरू शकते, याची चाचणी कंपनी करत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारातील कंपन्यांना मेटा एआय वापरासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असणार आहे, असे वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जून २०२४ मध्ये देशात चॅटबॉट लाँच करण्यात आले असून मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप इ. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची इन्स्टंट मेसेजिंग सेवा आहे.

विशेष म्हणजे मेटा एआय २०हून अधिक देशांत आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपचे देशात जवळपास ५०० दशलक्ष वापरकर्ते असून या सेवेसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. एकंदरीत, जगभरातील विविध कंपन्यांना एआय वापराकरिता भारताला सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्राधान्य दिले जात आहे.