देशातील तात्पुरत्या स्वरुपाच्या रोजगारनिर्मितीत ६ टक्के वाढ, आरबीआयचा अहवाल

    08-Jul-2024
Total Views |
bharat provisionally employment grew


नवी दिल्ली :      आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशातील रोजगारनिर्मितीत तात्पुरत्या स्वरुपात वाढ दिसून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने प्रसारित केलेल्या डेटानुसार ७ टक्क्यांच्या वाढीसह देशात ९ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


हे वाचलंत का? -     विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये २३ टक्क्यांनी वाढ!


दरम्यान, गेल्या आठवड्यात सिटी बँकेच्या अहवालानंतर आकडेवारीचे प्रकाशन करण्यात आले आहे ज्यात सात टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात११ ते १२ दशलक्ष नोकऱ्या आवश्यक असून मार्च २०२४ रोजी मागील आर्थिक वर्षात देशात तात्पुरत्या स्वरूपात ४६.७ दशलक्ष नोकऱ्या निर्माण झाल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे देशात एकूण ६४३.३ दशलक्ष रोजगारनिर्मिती झाली आहे, असे आरबीआयच्या अहवालात दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत रोजगार वाढीचा दर ६ टक्के होता, जो मागील आर्थिक वर्षात ३.२ टक्के होता, असे आरबीआयच्या उद्योग स्तरावरील उत्पादकता आणि रोजगार मोजण्याच्या अहवालात दिसून आले आहे.