UP मध्ये राहणाऱ्या शाहरुख अहमदचे पाकिस्तान प्रेम उफाळले; सोशल मीडियावर लिहिले, “भारतापेक्षा पाकिस्तान…”

    08-Jul-2024
Total Views |
 pakistan
 
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात पाकिस्तान प्रेमाचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे शाहरुख अहमदने त्याच्या सोशल मीडिया स्टेटसवर पाकिस्तानी शहर लाहोरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानचा ध्वजही दिसत आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये पाकिस्तानचे वर्णन खूप सुंदर असे करण्यात आले आहे. रविवार, दि. ७ जुलै २०२४ हिंदू संघटनेच्या सदस्यांनी या पोस्टवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण बरेली जिल्ह्यातील शिशगढ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रविवारी बरेलीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ता हिमांशू पटेल यांनी त्यांच्या एक्स हँडलद्वारे शाहरुख अहमदविरोधात तक्रार केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, जाफरपूर गावातील मोहम्मद शरीफ याचा मुलगा शाहरुख अहमद याने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओचे पाकिस्तान समर्थक असे वर्णन करण्यात आले असून त्यात 'पाकिस्तान खूप सुंदर आहे' असे लिहिले आहे. बरेलीतील समस्यांमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप हिमांशूने केला आहे.
हिमांशू पटेल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक वाहने वर्दळीच्या रस्त्यावर दिसत आहेत. समोरच्या हिरव्या फलकावर इंग्रजी आणि उर्दूमध्ये लाहोर लिहिलेले आहे. चित्राच्या मध्यभागी पाकिस्तानचा ध्वज छापलेला आहे. ‘पाकिस्तान इज व्हेरी लव्हली’ कॅप्शनमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले आहे. पाकिस्तान हा शब्द खास ठळक आणि हिरव्या रंगात बनवण्यात आला आहे. तक्रार केल्यानंतर आरोपीने त्याचे फेसबुक प्रोफाईल लॉक केले आहे.
पोलिसांनी दखल घेऊन कारवाई न केल्यास रीतसर तक्रार दाखल करून आरोपींवर कारवाई केली जाईल, असे हिमांशू पटेल यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या शाहरुखवर भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, बरेली पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. रविवारी, पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलद्वारे माहिती दिली की शिशगढच्या पोलीस स्टेशन प्रभारींना आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.