दहावी पास आहात : एसटी महामंडळात नोकरीची संधी

एसटी महामंडळात नोकरीची भरती सुरु...

    04-Jul-2024
Total Views |

ST  
 
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे एसटी महामंडळात नोकरी मिळणार आहे यामध्ये एकूण जागा ४३६ आहेत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास आहे आणि बी टेक पर्यंतचे उमेद्वार देखील अर्ज भरु शकतात. दहावी पास असणाऱ्या उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबधीत कोर्स झालेला आसावा.
 
नोकरीचे ठिकाण हे नाशिक आहे. आणि एसटी महामंडळात पगार १०,६१२ रुपये प्रतिमहिना मिळणार आहे. महामंडळाकडून ही प्रकीया राबवली जातेय यासाठी अरजदारांने आपला अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात भरावा. एसटी महामंडळात नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२४ ही आहे तर अधिक माहिती व अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल.
 
अर्जामध्ये पदाचे नाव लिहिणे गरजेचे आहे आणि ३३ वयोगटाचे उमेदवार हे भरतीसाठीचे अर्ज भरु शकतात.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर सर्वात आधी उमेदवाराला परिक्षा द्यावी लागणार आहे .त्यानंतर मुलाखत राउंड होईल सर्व कागदपत्रांच्या तपासणींनंतरच योग्य त्या उमेदवाराची निवड केली जाईल.