भारतीय भांडवली बाजारासंबंधी अहवालाचे 'सेबी' प्रमुखांकडून अनावरण

देशातील पहिली पॅसिव्ह फंड आधारित वेबसाईटदेखील "एनएसई"कडून लाँच

    30-Jul-2024
Total Views |
indian capital market report


मुंबई :       राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई)कडून 'इंडियन कॅपिटल मार्केट : ट्रान्सफॉर्मेटिव्ह शिफ्टस अचिव्ह थ्रू टेक्नोलॉजी अँड रिफॉर्म्स' अहवाल व देशातील पहिली पॅसिव्ह फंड वेबसाइट 'www.indiapassivefunds.com' लाँच एनएसई, डॉ. आर. एच. पाटील ऑडीटोरियम, बीकेसी येथे दि. ३० जुलै २०२४ रोजी आयोजित कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)च्या प्रमुख माधवी पूरी-बूच, राष्ट्रीय शेअर बाजाराचे एमडी आशिष चौहान, एनएसई बोर्ड ऑफ डिरेक्टर मुकेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सेबी प्रमुखांनी भारतीय भांडवली बाजारात तंत्रज्ञान आणि सुधारणांद्वारे साध्य केलेल्या परिवर्तनीय बदलांविषयीचा सखोल अहवाल प्रसिध्द केला. त्याचबरोबर, 'एनएसई'कडून पॅसिव्ह फंडांसाठी देशातील पहिल्या वेबसाइटदेखील लाँच केली. यावेळी बोलताना माधबी पुरी-बुच म्हणाल्या की, या अहवालात नियामक, मार्केट इन्फ्रास्टक्चर इन्स्टिट्यूट(एमआयआय) आणि बाजारातील भागीदारांद्वारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय भांडवली बाजारातील सर्वात महत्त्वपूर्ण सुधारणा, टप्पे आणि तांत्रिक नवकल्पनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व बाबींचा देशातील गुंतवणूकदारांवर प्रभाव आहे.

त्या पुढे म्हणाल्या, भांडवली बाजारात परिवर्तन आणि वाढ हे एक लवचिक, प्रगतीशील आणि तंत्रज्ञानावर आधारित परिसंस्था निर्माण करणारी सामूहिक दृष्टी असून यामुळे देशातील गुंतवणूकदार वर्गाला प्रवेश, माहिती आणि नियंत्रण प्रदान करत. एकूणातच, वर्धित गुंतवणूकदारांचा अनुभव, सक्षमता प्राप्त करण्यासाठी सर्व एमआयआय आणि बाजार मध्यस्थांसाठी सहयोग, नियमांच्या पुनरावलोकनासाठी अभिप्राय त्याचबरोबर, जोखमींना जलदपणे हाताळणे हे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा अहवाल भागधारकांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करेल, असेही माधवी पुरी-बूच यांनी सांगितले.


आम्हाला या अहवालाचे अनावरण करताना अभिमान वाटतो जो देशाच्या भांडवली बाजाराच्या उत्क्रांतीचे अनेक वर्षांतील सर्वसमावेशक विश्लेषण करतो. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग, शाश्वत तसेच, उच्च आवक आणि सूचीबद्ध कंपन्यांची मजबूत कामगिरी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भांडवली बाजारातील परिवर्तन यशस्वी करण्यासाठी मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था (एमआयआय) आणि इतर अनेक बाजार सहभागींनी वेगवान आणि तांत्रिक चातुर्याने सेबीचे उपक्रम स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी केली. आम्ही या प्रवासात सहभागासह सहकार्य केलेल्या नियामक, गुंतवणूकदार, एमआयआय आणि सर्व भागधारकांचे आभार मानू इच्छितो.
- आशिषकुमार चौहान, एमडी, सीईओ, राष्ट्रीय शेअर बाजार