गिरीश महाजनांच्या अटकेसाठी एसपींना अनिल देशमुखांची धमकी!

24 Jul 2024 16:58:31
 
Anil Deshmukh
 
पुणे : सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल देशमुखांनी तत्कालिन पोलिस अधीक्षकांना धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे.
 
जळगाव पोलिसांकडे आलेली गिरीश महाजन यांच्याविरोधातील खोटी तक्रार दाखल करु घ्या, असा दबाव अनिल देशमुखांनी तत्कालिन एसीपी प्रविण मुंडे यांच्यावर आणला होता. परंतू, संबंधित प्रकरण जळगावच्या कार्यक्षेत्रात घडलेलं नसल्याने त्याची तक्रार पुण्यात दाखल करून घ्यावी, असं ते गृहमंत्र्यांना सांगत होते. यावेळी अनिल देशमुखांनी त्यांचं न ऐकता त्यांच्यावर दबाव टाकला. प्रविण मुंडेंना फोन करुन ते धमकावत होते. त्यामुळेच ही खोटी तक्रार दाखल करण्यात आली, अशी कबुली प्रविण मुंडेंनी सीबीआयकडे दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनिल देशमुखांचे प्रयत्न!
 
जळगावमधील एका शिक्षण संस्थेसंबंधी हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादात गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यासाठी पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्यावर अनिल देशमुखांनी दबाव टाकला होता, असा अहवाल सीबीआयने मोक्का न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0