केंद्रीय अर्थसंकल्पात एसटीटी दरवाढ; "Zerodha"ला मिळणार इतके कोटी रुपये!

23 Jul 2024 17:50:00
zerodha union budget stt rate raised



नवी दिल्ली :        केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ आज संसदेत सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार हजार अंकांनी गडगडल्याचे पाहायला मिळाले. शॉर्ट टर्म ट्रेडिंगवरील करात वाढ करण्यात आली असून आता सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स(एसटीटी)मध्ये वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी शेअर ब्रोकिंग कंपनी "Zerodha"ला तब्बल २,५०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.


हे वाचलंत का? -    अर्थसंकल्प २०२४-२५! कोणत्या मंत्रालयाला मिळाला किती निधी; वाचा सविस्तर...
 

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात एसटीटी दरवाढीतून "Zerodha"ला २,५०० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती संस्थापक तथा सीईओ नितीन कामथ यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शेअर बाजाराशी संबंधित अनेक बदलांची घोषणा केली आहे.

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंग करताना ऑप्शन ट्रेडिंगवरील एसटीटी कर ०.०६२% वरून ०.१% वर गेला आहे. १ ऑक्टोबरपासून फ्युचर्सवरील एसटीटी ०.०१२५% वरून ०.०२% वर गेला आहे. गेल्या वर्षी सुमारे १५०० कोटी रुपये एसटीटीतून कंपनीत जमा झाले. तसेच, नवीन एसटीटी करांनुसार सुमारे २५०० कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज सीईओ कामथ यांनी व्यक्त केला आहे.






Powered By Sangraha 9.0