नवी दिल्ली : राज्य सरकार सेवेतील दीड लाख रिक्त पदे लवकरच भरणार आहे, असे प्रतिपादन ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी केले आहे. ओडिशा सरकार शासकीय सेवेतील १.५ लाख रिक्त पदे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने भरणार असून पुढील दोन वर्षांत ६५ हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे राज्यपाल दास यांनी सांगितले आहे.
हे वाचलंत का? -
ई-कॉमर्स विश्वात घसघशीत वाढ होणार; सुरक्षित वापरावर अधिक भर!
दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या १७ व्या ओडिशा विधानसभेच्या उद्घाटन सत्रादरम्यान बोलताना राज्यपाल म्हणाले, युवकांना आवश्यक अनुभव आणि कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षणार्थी संधी वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला आहे. या माध्यमातून राज्याचे उत्पादन केंद्रात रूपांतर करण्याच्या प्रयत्नात, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहने (EV), सेमीकंडक्टर यांसारख्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल.
राज्य उत्पादन केंद्र म्हणून मेक इन ओडिशा उपक्रमांतर्गत ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), सेमीकंडक्टर आणि आयटी/आयटीईएस सारख्या उद्योगांना प्राधान्य देईल, असे ते म्हणाले. २०२९ पर्यंत ३.५ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करा, ज्यामुळे राज्यभर आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला आहे.