ई-कॉमर्स विश्वात घसघशीत वाढ होणार; सुरक्षित वापरावर अधिक भर!
22-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. रेल्वे क्षेत्रासह संरक्षण क्षेत्रात मोठ्या तरतूदीची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील ई-कॉमर्स उद्योगात आगामी काळात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या काळात २०३० पर्यंत ई-कॉमर्स क्षेत्रात ३५० अब्ज डॉलर इतकी घसघशीत वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात ई-कॉमर्ससह आधुनिक रिटेलचा वाटा पुढील ३ ते ५ वर्षांत एकूण किरकोळ विक्रीच्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत जाईल, नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४मध्ये देशातील ई-कॉमर्स उद्योग २०३० पर्यंत ३५० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. यात ई-कॉमर्ससह आधुनिक रिटेलचा हिस्सा ३०-३५ पर्यंत जाईल. पुढील ३ ते ५ वर्षांत एकूण किरकोळ विक्रीत वाढ अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबद्दल वापरकर्त्यांना सजग करणे अत्यावश्यक बनले आहे, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षणात सूचीबद्ध काही धोरणांचा घटक असलेल्यांपैकी डिजिटल इंडिया कार्यक्रम, युपीआय, एक जिल्हा-एक उत्पादन (ओडीओपी), डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओएनडीसी), नवीन विदेशी व्यापार धोरण, एफडीआय मर्यादांमध्ये शिथिलता आणि ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) अंतर्गत आर्थिक सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, देशातील ई-कॉमर्सच्या वाढीला ऑनलाइन विक्री, डेटा गोपनीयतेच्या समस्या आणि ऑनलाइन फसवणुकीसाठी अपुरी कौशल्ये यांचा अडथळा आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.