पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाने २५ जुलैपर्यंत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. पूजा यांचे वडील दिलीप खेडकरसुद्धा यात आरोपी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे वाचलंत का? - डीपीडीसीच्या बैठकीसाठी शरद पवार आणि अजितदादा समोरासमोर!
तेव्हापासूनच दिलीप खेडकर फरार आहेत. त्यानंतर अॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आता दिलीप खेडकर यांना २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायाधिश ए. एन. मारे यांनी हा जामीन मंजूर केला. तसेच पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घरातून पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्या आहेत.