FD Rates 2024 : आकर्षक गुंतवणूक पर्यायातून ग्राहकांना किती मिळते व्याज!

18 Jul 2024 17:44:15
fixed deposit return bank



मुंबई :          मुदत ठेवी(एफडी)वर जुलै महिन्यात बँकांनी दिलेले व्याजासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा मुदत ठेवींवरील व्याजदर समोर आला असून जोखीम न घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ग्राहकांच्या बचतीवर सुरक्षित आणि अंदाजे परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एफडीवर ८ टक्क्यांहून अधिक व्याज मिळते. दरम्यान, युनिटी स्मॉल फायनान्स बँक १,००१ दिवसांसाठी ०९ टक्के व्याज देते. तर येस बँक १८ महिन्यांसाठी ०८ टक्के व्याज देते.




विशेष म्हणजे जुलै २०२४ मध्ये एफडी व्याजदर एकूण ११ राष्ट्रीयकृत बँका ०८ ते ०९ टक्के व्याजदर देताना दिसून येत आहे. ०८ टक्क्यांहून अधिक व्याजदर देतानाच जोखीम नसलेल्या गुंतवणुकीचा हा एक आकर्षक पर्याय बनत आहे. पैसाबाजार नुसार, मुदत ठेव योजनांवर ग्राहकांना ०८ टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदर ऑफर करणाऱ्या बँकांचे व्याजदर समोर आले आहे.


करपात्रता

तुम्हाला माहित आहे का मुदत ठेव(एफडी) वर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे? तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार एफजी रिटर्नवर कर भरावा लागेल. आर्थिक वर्षात तुमची एफडी रिटर्न ४० हजारांपेक्षा जास्त असल्यास १० टक्के टीडीएस कापला जाईल. उत्पन्न टॅक्स ब्रॅकेटच्या खाली येत असल्यास फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५एच (ज्येष्ठ नागरिकांसाठी) सबमिट करून टीडीएस टाळू शकता. तथापि, एफडी ५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीत मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी मिळत ​​नाही.


आरबीएल बँक

सर्वोच्च स्लॅब: १८ महिने ते २ वर्षांसाठी ८ टक्के
१ वर्षाचा कार्यकाळ: 7.50 टक्के
३ वर्षांचा कार्यकाळ: ७.५० टक्के
५ वर्षांचा कार्यकाळ: ७.१० टक्के


येस बँक

सर्वोच्च स्लॅब: १८ महिन्यांसाठी ८ टक्के
१ वर्षाचा कार्यकाळ: ७.२५ टक्के
३ वर्षांचा कार्यकाळ: ७.२५ टक्के
५ वर्षांचा कार्यकाळ: ७.२५ टक्के


ड्यूश बँक
 
सर्वोच्च स्लॅब: १ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा जास्त काळासाठी ८ टक्के
१ वर्षाचा कार्यकाळ: ७ टक्के
३ वर्षांचा कार्यकाळ: ८ टक्के
५ वर्षांचा कार्यकाळ: ७.५० टक्के
 
Powered By Sangraha 9.0