फिनटेक उद्योगात ३१ टक्क्यांची वाढ होणार; मोदी सरकारच्या धोरणांचे फलित!
18-Jul-2024
Total Views |
मुंबई : फिनटेक इंडस्ट्रीजमध्ये पुढील १० वर्षांत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत, फिनटेक उद्योग अंदाजे ११० अब्ज डॉलर इतका असेल. आगामी काळात ३१ टक्क्यांच्या वाढीसह फिनटेक उद्योग सुमारे ४२० अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. इंडस्ट्री चेंबरच असोचेमच्या अहवालानुसार पुढील दहा वर्षात फिनटेक उद्योगात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे.
दरम्यान, भारतीय फिनटेक उद्योग २०२४ मध्ये अंदाजे ११० अब्ज डॉलर इतका असेल. वर्ष २०२९ पर्यंत ४२० बिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, सरकारच्या अनुकूल धोरणांसारख्या घटकांमुळे या क्षेत्राची वाढ होत राहण्याची अपेक्षा आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाशी निगडीत नवीन उपक्रमांतून चालणाऱ्या फिनटेक इकोसिस्टममुळे पारंपारिक वित्तीय सेवांमध्ये क्रांती घडवून आली असून आर्थिक उत्पादने आणि सेवांच्या वितरणाच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली आहे.
विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेल्या तरुण लोकसंख्येसह डिजिटल अर्थव्यवस्थेकडे अधिक भर देणाऱ्या सरकारचा फिनटेक क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न असेल, अशी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अनुकूल धोरणांचा फायदा पायाभूत सुविधा, दळणवळण यांसारख्या क्षेत्रांसह फिनटेक या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्यास होत राहील,असा अंदाज आहे.