नवी दिल्ली : देशातील ७ राज्यांमधील १३ विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून इंडी आघाडीतील घटकपक्षांना १०, भाजपला २ तर एका जागी अपक्ष उमेदवारास विजय मिळाला आहे. बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशातील देहरा आणि नालागढ मतदारसंघात काँग्रेस तर हमीरपूरमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
हे वाचलंत का? -
आसाम आणि त्रिपुरामध्ये रस्ते प्रकल्पांना मंजुरी
दरम्यान, मध्य प्रदेशातील अमरवाडा येथेही भाजपला विजय मिळाला आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये आप, तामिळनाडूतील विक्रांवाडीमध्ये द्रमुकचा विजय झाला आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोरमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. पश्चिम बंगालमधील रायगंज, रणघाट दक्षिण, बगदा आणि मानिकटोला येथे तृणमूलस काँग्रेसचा विजय झाला आहे.