काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये 'रामनगर' जिल्ह्याचे नाव बदलण्याचा घाट; भाजपनं केला विरोध

    10-Jul-2024
Total Views |
 GANDHI
 
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर केला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवार, दि. ९ जुलै कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण जिल्ह्या असे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे सादर केला.
 
बेंगळुरूच्या जागतिक प्रतिष्ठेचा उपयोग करणे हे नाव बदलण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयावर भाजप आणि जेडीएसने आक्षेप व्यक्त केला आहे. भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले, "सध्याचा काँग्रेस पक्ष हिंदूंचा द्वेष करतो आणि पक्षाची रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे."
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, " राहुल गांधी यांनी नुकतेच रामजन्मभूमी आंदोलनाचा पराभव केल्याचे सांगितले होते. आता डी.के. शिवकुमार रामनगरमधून निवडून येतील. हे नाव आवडत नाही कारण ते नाव श्रीरामाच्या नावावर आहे, काँग्रेस किती दिवस हिंदूंना शिव्या देत राहणार?" त्याचवेळी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, कर्नाटकात भाजपचे सरकार बनताच आम्ही पुन्हा रामनगरचे नामकरण करू.