'अभी तो करबला का आखिरी मैदान बाकी है...'; कट्टरपंथींना भडकवण्याचा धर्मांधांचा डाव

    10-Jul-2024
Total Views |

Karbala Satara Poster

मुंबई (प्रतिनिधी) : (Karbala Satara Poster) 
सातारा शहरात काही अज्ञातांकडून खुलेआम 'करबलाच्या लढाई'बद्दलचे मोठे बॅनर लावल्याचे निदर्शनास आले आहे. हे पोस्टर 'करबलाच्या लढाई'साठी अल्पसंख्याकांना भडकवण्यासारखे आहे. 'लिगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी - एलआरओ' नामक एक्स अकाऊंटवरून हे प्रकरण उघडकीस आले आहे.

हे वाचलंत का? : अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंची रेकॉर्डब्रेक नोंद; दहा दिवसांत ओलांडला दोन लाखांचा टप्पा!

या बॅनरवर इस्लामिक नववर्षाच्या शुभेच्छांसह करबलावर विपुल लेखन केल्याचे दिसते आहे. त्यामध्ये 'न घबराओ मुसलमानो अभी खुदा की शान बाकी है, अभी इस्लाम जिंदा अभी कुरआन बाकी है, ये जालीम लोग क्या समझते हैं जो रोज हमसे उलझते हैं, अभी तो कर्बला का आखिरी मैदान बाकी है ।' अशा काही ओळींचा समावेश करण्यात आला आहे. मुस्लिमांना करबलाच्या लढाईसाठी तयार होण्यास सांगण्यात आले आहे.


सोबतच बॅनरमध्ये हिंदूंना संबोधत क्रूर असे लिहिले आहे. सध्याच्या माहितीनुसार, करबलाची लढाई शिया आणि सुन्नी यांच्यातील संघर्षाशी संबंधित आहे, परंतु आज इस्लामवादी हिंदूंना काफिर म्हणत त्याचा वापर करतात. गुजरातमधील जुनागढ शहरात ५६ मिनिटांच्या भाषणादरम्यान मुफ्ती सलमान अझरी यांनी असे वादग्रस्त विधान केले होते. त्यातही अजहरीने भाषणात तेच शब्द वापरले होते जे या बॅनरवर झळकवण्यात आले आहेत. एलएसओने आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा, पीएम मोदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना टॅग केले असून यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.