केरळमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविलं; आता केंद्रात मंत्रीपद?

    07-Jun-2024
Total Views |
become-cabinet-ministerनवी दिल्ली : 
   केरळमध्ये भाजपने आपले खाते खोलले असून सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून दणदणीत विजय मिळविला आहे. गोपी यांना ७४ हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळाला असून केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये पहिल्यांदा खासदार निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, दक्षिण भारतात जास्तीत जास्त जागा जिंकून येण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सुरेश गोपी यांच्या रुपात केरळमध्ये भाजपला एक जागा जिंकता आली. तसेच, सुरेश गोपी आता पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद भूषविण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना सुरेश गोपी म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, राज्यातील पहिला भाजप खासदार होण्याचा भार मी डोक्यावर उचलत नाही. ते पुढे म्हणाले की, ते फक्त खासदार आहेत. ते म्हणाले की, जे कोणी करू शकत नाही, ते काम धैर्याने आणि शौर्याने केले पाहिजे. तसेच, अनेकांनी फोन करून केंद्रीय मंत्री करण्याबाबत सल्ला दिल्याचेही नवनिर्वाचित खा. सुरेश गोपी यांनी सांगितले.