कॅनडात खालिस्तानी समर्थकांची पुन्हा एकदा आगळीक; इंदिरा गांधींच्या हत्येचे महिमामंडन

    07-Jun-2024
Total Views |
 Khalistani
 
नवी दिल्ली : कॅनडामधील खालिस्तानी समर्थकांची भारताच्या विरोधात पुन्हा एकदा आगळीक केली आहे. कॅनडाच्या सरकारने देखील भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतविरोधी घटकांना मोकळीक दिली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४० वर्षांच्या निमित्ताने कॅनडात खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. या वेळी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे महिमामंडन करणारी झांकी काढण्यात आली होती.
 
खलिस्तान समर्थकांनी व्हँकुव्हरमधील वाणिज्य दूतावासासमोर नेली. यामध्ये इंदिरा गांधींचे चित्र गोळ्यांनी छिन्नविछिन्न दिसत होते. भारत या प्रकरणावर औपचारिक निषेध करू शकतो. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्यासह खलिस्तानी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन ब्लूस्टार सुरू करण्यात आले.
  
कॅनडामध्ये शिख फॉर जस्टिस या फुटीरतावादी गटाने भारताचे मिशन बंद करण्याचे आवाहन केले. एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी औपचारिक राजनयिक तक्रार सादर केली जाईल. निदर्शनादरम्यान भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय भारत आणि रशियाचे ध्वजही जाळण्यात आले.