एनएसईत आज जागतिक रेकोर्ड आशिष चौहान यांनी एक्सवर लिहिले

आज दिवसभरात १९७१ कोटी ऑर्डर एनएसईने हाताळल्या

    05-Jun-2024
Total Views |

NSE
 
 
मुंबई: एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) वर आज सर्वाधिक व्यवहार झाले आहेत. एका दिवसात रेकॉर्डब्रेक व्यवहार झाल्याचे एक्सवर एनएसईचे सीईओ आशिष चौहान यांनी म्हटले आहे. आज एकाच दिवसात १९७१ कोटींच्या ऑर्डर हाताळल्या आहेत. तसेच २८.५५ कोटींचे ट्रेडिंग आज एनएसईत झाले आहे.
 
आपल्या पोस्टमध्ये आशिष चौहान यांनी म्हटले आहे की, '@nseindia ने आज ५ जून २०२४ रोजी एका दिवसात ६ तास आणि १५ मिनिटांत (सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत) एका दिवसात आतापर्यंतचा सर्वाधिक जागतिक विक्रम - व्यवहारांची संख्या हाताळली -१९७१ कोटी (19.71 अब्ज) ऑर्डर, २८.५५ कोटी (२८०.५५ दशलक्ष ) व्यापार झाला ' असे म्हणाले आहेत.
 
आज सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी ७३६ अंशाने वाढत २२२६० रुपयांवर पोहोचला आहे.काल एन एसईत ६ टक्क्यांनी घसरण झाली होती.यापूर्वी एनएसईने पहिला थिमाटिक इंडेक्स काढला होता.भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुढील सरकार स्थापन करण्याबाबत गुंतवणूक दारांनी आशावाद दर्शविल्याने बुधवारी इक्विटी मार्केटनेही आदल्या दिवसाच्या तुलनेत प्रभावी तेजी दर्शविली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुस-या टर्मचा राजीनामा दिला आहे आणि ते 8 जून रोजी तिसऱ्या टर्मसाठी शपथ घेणार आहेत असे अहवाल सांगतात.