५ जी स्पेक्ट्रम आता लिलाव १३ व १४ जूनला

तारीख बदलल्याने DoT विभागाकडून स्पष्ट

    05-Jun-2024
Total Views |

Specturm
 
 
मुंबई: ५ जी स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जी स्पेक्ट्रम सुरूवातीला २० मे रोजी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने सोमवारी Notice Inviting Applications (NIA) ने आपल्या नोटीशीत बदल केला आहे.
 
निवडणूक निकालानंतर सरकारचे स्पेक्ट्रम लिलावाचे नियोजन होते. दुसऱ्यांदा स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलली गेली. आता लिलावासाठी सुधारित तारीख १३ ते १४ जून ही असू शकणार आहे असे DoT ने सांगितले आहे. ५ जी एअर व्हेव 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz, 3.3 GHz, 26 GHz बँड लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. ९६००० कोटींचे बेस प्राईज लिलावासाठी निश्चित करण्यात आला आहे.
 
तज्ञांच्या मते यावेळी फार गवगवा न होता साध्या पद्धतीत हा लिलाव होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या लिलावात समभागी होऊ शकतात.