"आजारी माणसाला खालून वर नेऊन देवेंद्रजींनी समाजसेवा केली!"

28 Jun 2024 14:29:40

Thackeray & Fadanvis
 
मुंबई : देवेंद्रजींनी आजारी माणसाला खालून वर नेऊन समाजसेवा केली. त्यात काहीच वावगं नाही, असा खोचक टोला सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिला.
 
नितेश राणे म्हणाले की, "एका आजारी माणसाला जर देवेंद्रजी खालून वर घेऊन गेले तर त्यात काहीच वावगं नाही. माणूस आजारी आहे, त्यांच्या छातीत ९ स्टँप आहेत, जिन्याने वर चढण्याची त्यांची अवस्था नाही. अशावेळी जर देवेंद्रजींनी समाजसेवा केली असेल तर त्यात वाईट काही नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  "...तर त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना शब्द का दिला नाही?" राणेंचा राऊतांना सवाल
 
"उद्धव ठाकरेंना चॉकलेट, मिठाई काहीही द्या, ते कधी बाळासाहेबांचे झाले नाहीत तो माणूस कुणाचाही होणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. त्यांना काहीही दिलं तरी त्यांच्या रक्तातच गद्दारी आहे," अशी टीकाही नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0