"...तर त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना शब्द का दिला नाही?" राणेंचा राऊतांना सवाल

    28-Jun-2024
Total Views |
 
Rane & Raut
 
मुंबई : तुम्हाला भाजपची एवढीच अॅलर्जी आहे तर मग प्रकाश आंबेडकरांना शब्द का दिला नाही? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे. संजय राऊतांनी भाजपसोबत जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "भाजपबरोबर जाऊन आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही, अशी वल्गना संजय राजाराम राऊत करत होते. जर तुम्हाला भाजपची एवढीच अॅलर्जी आहे तर मग हल्लीच झालेल्या लंडनच्या सुट्टीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे कोणत्या भाजपच्या नेतेमंडळींना भेटले याचे फोटो आणि व्हिडीओ दाखवायचे का? तेव्हा तुम्हाला भाजप अपवित्र वाटला नाही का?"
 
हे वाचलंत का? -  नो क्लोजओवर ओन्ली बुलडोझर! ड्रग्जची पाळंमुळं नष्ट करणार
 
"ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला मविआच्या बैठकीत तुम्ही भाजपसोबत जाणार नाही हे आम्हाला लिहून द्या असं विचारलं, त्यावेळी तुम्ही ते का लिहून दिलं नाही? त्यामुळे उगाच दिल्लीमध्ये बसून आता वल्गना करायच्या आणि तुमचे नेते भाजपच्या नेत्यांना कसे भेटतात याचं प्रेझेंटेशन महाराष्ट्रासमोर दाखवावं लागेल," असे ते म्हणाले.