नो क्लोजओवर ओन्ली बुलडोझर! ड्रग्जची पाळंमुळं नष्ट करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन
28-Jun-2024
Total Views |
मुंबई : राज्यातून पुर्णपणे ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही. ड्रग्जची पाळंमुळं नष्ट होत नाही तोपर्यंत कारवाई सुरु राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तरुण पीढी नशेच्या आहारी जाऊ नये. ते भारताचं भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचं आयुष्य भविष्य उध्वस्त होऊ नये यासाठी आम्ही ड्रग्ज विकणारे, ठेवणारे आणि ते पुरवणारे या सगळ्यांवर कारवाई करणार आहोत. त्यांना तुरुंगात टाकून जामीन मिळू नये अशा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये टाकणार."
ड्रग्जची खोलवर रुजलेली पाळंमुळं नष्ट करणार त्यांचे ड्रग्जचे अड्डे उखडून टाकणार आहोत. हे ड्रग्ज पुर्णपणे संपेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही, असे म्हणत त्यांनी नो क्लोजओवर ओन्ली बुलडोझर, असं वक्तव्य केलं. तसेच ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करुन तरुण पीढीला वाचवायचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.