बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र बनवून घुसखोरी़, तपास यंत्रणेकडून कारवाई!

26 Jun 2024 19:36:29
manipur-fake-aadhar-voter-id-card


नवी दिल्ली :      मागील काही महिन्यांपासून मणिपूरात हिंसाचार उफाळलेला असताना कुकी व मैतेई समुदायात संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संघर्षानंतर बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या टोळीचा आता पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांचे विशेष पथक माग काढत असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, पोलिसांनी चुरचंदपूर येथून म्यानमारमधील २ अवैध घुसखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी अवैध व्यक्तींकडून दोन बनावट ओळखपत्रे सापडली असून संबंधित प्रकरणांचा पोलिस तपास करत आहेत. दक्षिणी मणिपूर हे काफ्राझी दस्तऐवज बनावट टोळ्यांविरुद्ध सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या मोहिमेचे केंद्र आहे. केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण देशाला धोका असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

दुसरीकडे, म्यानमारमध्ये हुकूमशाही जंटा आर्मी आणि लोकशाही समर्थकांमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यातील अनेक जणांनी पलायन करत भारतात दाखल झाले आहेत. त्यांचे बायोमेट्रिक्स मणिपूरमध्ये नोंदवले गेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र बनवून घुसखोर मणिपूरमध्ये स्थायिक होणाऱ्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत आहे. २०२३ मध्ये, काकचिंगमधील कुकी ख्रिश्चनांच्या तोडलेल्या घरांमधून १००० हून अधिक बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली होती.




Powered By Sangraha 9.0