मुंबई : मान्सून सरू झाला की तरुणाई वीकेंड किंवा अन्य दिवशी सुट्टी काढून ट्रिप प्लॅन करताना दिसून येते. याच ट्रिपदरम्यान काहीवेळेस अनुचित प्रकार समोर येतात. तसेच, दुर्घटनेच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहावयास मिळतात. आता रायगडमधील अलिबाग येथे तलावात पोहायला गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
तलावात बुडून मृत पावलेल्या मुलाची नावे अथर्व हाके व शुभम बाला अशी आहेत. मुनवली येथील तलावात पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पोहताना दोघेही बेपत्ता झाल्यानंतर शोध घेण्यात आला असता अथर्व याचा मृतदेह सापडला असून शुभम याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे.