मुंबई : म्हाडात अनेक वर्षांपासून दलालराज्य आहे. कित्येक दलालांच जणू मुख्यालयाला विळखाच बसला आहे.घरे देतो म्हणून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची म्हाडाच्या दक्षता विभागाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून सुरक्षा रक्षकांना या दलालांना चाप लावण्याचे आदेश दिले आहेत. गरजू नागरिकांना घरे देतो म्हणून त्यांना म्हाडा मुख्यालयात आणून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांची तक्रार मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या दक्षता विभागाकडे आल्याने अश्या तीस दलालांवर कारवाई करत त्यांची यादी सुरक्षा रक्षकांना देण्यात आली असुन त्यांना म्हाडात बंदी केली आहे.
सुरक्षा रक्षकांनी यादीतील आरोप असणाऱ्या दलालांना म्हाडा मुख्यालयात शिरकाव करू देऊ नये. तसेच त्याव्यतिरिक्त जे कोणी वारंवार कोणत्याही ठोस कामाविना मुख्यालयात येत असतात त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे, मुख्यालयात सर्वत्र बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने दक्ष रहावे, प्रवेशद्वारातून अभ्यागतांना प्रवेश देताना सुरक्षा रक्षकांनी ठरलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पालन करावे, अशा सूचना सुरक्षा विभागाला करण्यात आल्या असल्याचे म्हाडाचे मुख्य दक्षता अधिकारी विनित अग्रवाल यांनी मुंबई तरुण भारत'ला सांगितले.