"घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ५ आठवडे झाले पण...;" किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

22 Jun 2024 18:18:48
 
Kirit Somaiya
 
मुंबई : घाटकोपर होर्डिग दुर्घटनेला ५ आठवडे झाले असतानाही या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत खेद व्यक्त केला.
 
 
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ५ आठवडे झाले आणि ५ लोकांना अटक झाली आहे. परंतू, या घोटाळ्यात जे सहभागी झालेल्या एकाही महापालिका अधिकारी आणि एकही रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांवर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही ही खेदाची बाब आहे," असे ते म्हणाले आहेत.
 
हे वाचलंत का? -  लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
 
दिनांक १३ मे रोजी अवकाळी पावसामुळे मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास ७५ लोक जखमी झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून यात एकूण सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0