'NEET-UG' Case : माजी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे, मास्टरमाईंडचा अन्य प्रकरणात सहभाग!

20 Jun 2024 16:56:59
neet ug mastermind


नवी दिल्ली : 
   'NEET-UG' पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान सरकारमधील कनिष्ठ अभियंता(जेई) पदावर कार्यरत असणाऱ्या सिकंदर कुमार यदुवंशी याचे नाव 'NEET-UG' पेपर लीकप्रकरणात उघडकीस आले आहे. कनिष्ठ अभियंता यदुवंशी पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. दरम्याान, याआधीदेखील पेपरफुटी आणि भ्रष्टाचार प्रकरणात यदुवंशी तुरुंगात गेले आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये काही महिन्यांपूर्वी शिक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका घोटाळा आणि एनईईटी पेपर लीक प्रकरण याच टोळीने घडवून आणले होते. ज्यात सिकंदर कुमार यदुवंशी याचे नाव आहे, असे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात समोर आले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी मोठा दावा केला असून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी आरोपीचे जवळचे संबंध आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर यादवने ०४ मे रोजी मेव्हणीची पत्नी रीना कुमारी आणि मुलगा अनुराग यांना एनएचएआय गेस्ट हाऊसमध्ये होस्ट केले होते. दि. ५ मे रोजी पोलिसांनी रीनाला एनएचएआय गेस्ट हाऊसमधूनच अटक केली. गेस्ट हाऊसच्या एंट्री रजिस्टरमध्ये विद्यार्थी अनुराग यादवच्या नावापुढे कंसात 'मंत्रीजी' असे लिहिले आहे. इतकेच नाही अशा परिस्थितीत सिकंदर यादव कोण आहे आणि त्याने 'NHAI' मधील खोली कशी बुक केली, हा मोठा प्रश्न आहे.





Powered By Sangraha 9.0