'NEET' प्रकरणात नवी अपडेट, 0.001 टक्के निष्काळजीपणा असेल, तरी....!

18 Jun 2024 16:28:26
neet case supreme court


नवी दिल्ली :     नीट(NEET) परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नवा आदेश दिला असून एनटीए(नॅशनल टेस्ट एजन्सी) आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देताना म्हटले आहे की, जर एखाद्याच्या बाजूने 0.001 टक्के निष्काळजीपणा असेल, तर त्यावर कारवाई करून त्याला पूर्णपणे सामोरे जावे.




दरम्यान, देशातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षेची तयारी करताना वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत विसरता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, NEET-UG मध्ये ०.००१ टक्के निष्काळजीपणा असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आदेश देताना सांगितले की, एनटीएकडून वेळेवर कारवाईची अपेक्षा असून याप्रकरणी पुढील सुनावणी ०८ जुलै रोजी घेण्यात येईल.

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, "विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली असून त्यांची मेहनत विसरता येणार नाही. जर ०.००१ टक्केही त्रुटी आढळली तर त्यावर कठोर कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा देतानाच न्यायालयाने याप्रकरणी एनटीएला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.





Powered By Sangraha 9.0