बिहारमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींचा छळ; नूर आलमसह अन्य संशयित!

    18-Jun-2024
Total Views |
harassment-with-hundreds-of-girls


नवी दिल्ली :       बिहारमधील मुझफ्फरपूर येथे तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल २०० मुलींना नोकरीचे आमिष दाखवत अनेक महिने ओलीस ठेवल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी ९ जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, डीव्हीआर नावाच्या मार्केटिंग कंपनीत नोकरीसाठी फसवणुकीचे कॉल करतानाच जॉब मिळताच लक्ष्य पूर्ण केले नाही तर तिला सिगारेटने जाळले किंवा बेल्टने मारहाण केली. या सर्वप्रकारात अन्य काही मुलींना फसवणुकीच्या प्रयत्नात एक तरुणी कशीबशी निसटली. त्यानंतर तिने थेट कोर्ट गाठत सर्व प्रकाराची माहिती दिली.

या प्रकारात निसटलेल्या मुलीने सांगितले की, दहावी-बारावीच्या मुलींना फसवणुकीसाठी जाळ्यात अडकविले जात आहे. तिने पुढे सांगितले, मुझफ्फरपूरची टोळी १०वी-१२वी वर्गातील मुलींना बेल्टने मारहाण करून सिगारेटचे चटके देण्यात आल्याचेही ती म्हणाली. यात आरोपींनी सर्वप्रकाराचे व्हिडीओदेखील बनविले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनीही एफआयआरमध्ये उशीर झाल्याचे मान्य केले आहे.