दहशतवादी हल्ला झालेल्या रियासीमध्ये "इंजिनियरींग वंडर"!

17 Jun 2024 16:43:05
railway-bridge-jammu-kashmir


नवी दिल्ली :   
   जम्मू व काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जवळपास तयार झाला आहे. या रेल्वे पूलाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून रामबन ते रियासी रेल्वेमार्गासाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेष येत्या काही दिवसात लवकरच चिनाब रेल्वे पूल लवकरच कार्यान्वित तर रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, देशात सध्या कन्याकुमारी ते कटरा अशी रेल्वे सेवा सुरू असून याशिवाय काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला ते सांगलदानपर्यंत रेल्वे सेवाही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा पूल भारतीय अभियंत्यांचा चमत्कार असून जगातील आठवे आश्चर्य म्हटल्यास वावगे ठरू नये. या पूलाच्या उभारणीमुळे दहशतवादी हल्ला झालेल्या राज्यात विकासाचे चित्र जगाला दिसणार आहे.



“आधुनिक जगात हा अभियांत्रिकीचा चमत्कार असून ज्या दिवशी रेल्वे रियासीला पोहोचेल तो दिवस जिल्ह्यासाठी मोठ्या बदलाचा क्षण असेल. आमच्यासाठीही हा खूप अभिमानाचा क्षण आहे, असे उपायुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान, रेल्वेपुलाची चाचपणी पूर्ण झाली असून रेल्वे मार्ग लवकरच कार्यान्वित होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी येथे कसून पाहणी केली आहे.





Powered By Sangraha 9.0