'मिड-डे' कडून 'ती' पोस्ट डिलीट; माफी न मागता काढला लेख!

    17-Jun-2024
Total Views | 378
mid day article deleted


मुंबई :     
 इंग्रजी दैनिक मिड-डे कडून ईव्हीएमवर ५ कॉलमच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला लेख हटविण्यात आला आहे. दरम्यान, ओटीपीद्वारे ईव्हीएम अनलॉक करण्याच्या मुद्द्यावर ‘मिड-डे’ने पसरवलेल्या भ्रामक माहितीवर दैनिकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
 

मिड-डे या दैनिकाने वृत्तपत्राच्या पहिल्या पानाच्या कोपऱ्यात लिहिले आहे की, 'फोनवर मिळालेल्या ओटीपीने ईव्हीएम अनलॉक केले जाऊ शकतात' असा जो अहवाल त्यांनी यापूर्वी प्रसिद्ध केला होता तो चुकीचा होता, असे होऊ शकत नाही. तसेच, नुकत्याच झालेल्या अहवालात त्यांनी निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून एक छोटासा अहवाल दिला आहे.

दरम्यान, मिड-डे ने ऑनलाईन आवृत्तीमधून लेख काढून टाकला असून माफी न मागता प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले की, ईव्हीएम हे नॉन-प्रोग्रामेबल मशीन असून ते अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही.



 

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121