उसाच्या रसात मिळवली थुंकी! आरोपी शाहेब आलम आणि जमशेद खानला पोलिसांनी घेतले ताब्यात

17 Jun 2024 12:38:50
 Sugarcane Juice
 
लखनौ : अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात कट्टरपंथी आपल्या थुंकीचा वापर करत आहेत. काही दिवसांपूर्वी फेस मसाज आणि शेव्हिंगमध्ये थुंकीचा वापर केल्याची घटना समोर आली होती. नोएडामधून एक नवे विचित्र प्रकरण समोर आले आहे. प्रकरण सेक्टर-१२१ येथील क्लियो काउंटीचे आहे. इथे ज्यूस बनवणारे शाहेब आलम आणि जमशेद खान यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी आधी ग्लासात थुंकले, मग त्यात उसाचा रस टाकला.
 
वास्तविक एका जोडप्याने उसाचा रस मागवला होता. ज्यूस बनवणाऱ्यांची ही कृती पाहून त्यांनी विरोध केला असता संतप्त झालेल्या दोघांनी जोडप्याशी गैरवर्तन केले. युपी पोलिसांनी दाम्पत्याच्या तक्रारीनंतर कारवाई केली. या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही क्लियो काउंटी सोसायटीबाहेर ज्यूस विकायचे. सोसायटीतील क्षितिज भाटिया यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार, दि. १५ जून २०२४ सायंकाळी ते पत्नीसोबत ज्यूस पिण्यासाठी गेले होते.
 
हे वाचलंत का? -  "आपल्याला यापुढे IMF समोर हात पसरवण्याची गरज राहणार नाही"; भुकेकंगाल पाकच्या पंतप्रधानांचे जनतेला आश्वासन
 
जोडप्याने शाबेब आलम आणि जमशेद खान यांना दोन ग्लास उसाचा रस मागवला. दोघांनी ग्लासात थुंकून उसाचा रस दिला, जो दोघांनी पाहिला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील बहराइचचे रहिवासी आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. उत्तर प्रदेशातील शामलीनंतर राजधानी लखनऊमध्ये ग्राहकाच्या चेहऱ्यावर थुंकून मसाज केल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद जैदने लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी भागात हे केले.
 
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील ठाणे भवन पोलीस स्टेशन परिसरात एक न्हावी थुंकीने चेहऱ्याची मालिश करताना दिसला. शामली कोतवालीच्या फव्वरा चौकाजवळ तंदूरवर थुंकून रोटी भाजल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गाझियाबादच्या लोनी येथील एका हॉटेलमध्ये तंदुरी रोटीवर थुंकणारा आणि पॅक करत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशी अनेक प्रकरणे नुकतीच समोर आली आहेत, ज्यात कट्टरपंथीयांना थुंकण्यामुळे अटक करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0