काँग्रेसशासित तेलंगणामध्ये गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला; भाजप आमदार टी राजा सिंह यांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात

16 Jun 2024 18:57:36
 Raja Singh
 
हैदराबाद : तेलंगणा पोलिसांनी रविवार, दि. १६ जून २०२४ हैदराबादमधील गोशमहल येथून भाजप आमदार टी राजा सिंह यांना अटक केली. हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. राजा सिंह हे मेडक जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात होते. गायींना वाचवत असताना त्यांच्यावर शनिवार, दि. १५ जून २०२४ गो तस्करांनी हल्ला केला होता.
 
माध्यमांशी बोलताना टी राजा सिंह म्हणाले की, "त्यांना दोन दिवस नजरकैदेत ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. स्वतः आमदार राजा सिंह यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांच्या अटकेची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, जो हैदराबाद विमानतळाचा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये राजा सिंह त्याच्या काही मित्रांसोबत जात आहेत.
 
 हे वाचलंत का? - काश्मीरमधील दहशतवादावर अखेरचा घाव घालण्यासाठी यंत्रणा सज्ज; गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र सुरू
 
त्यांच्यासोबत अनेक पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. व्हिडिओच्या शेवटी राजा सिंह पोलिसांसह विमानतळाबाहेर येतात. येथे, थोड्या संभाषणानंतर, पोलिस त्यांना कारमध्ये घेऊन जातात. तेलंगणा पोलिसांच्या या कारवाईवर सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. पोलिसांच्या या कृतीवर त्यांनी टीका केली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी येथील रामदास चौरस्ता परिसरात गायी घेऊन जाणाऱ्या काही लोकांना अडवले. या गोरक्षकांनी आरोपींना गाय तस्कर म्हणत आंदोलन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, गो तस्करांना समर्थन करणारे लोकही जमा होऊ लागले. काही वेळातच दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  "भारतात फक्त अल्लाह-हू-अकबर नारा आहे, जो कोणी देणार नाही..."; प्रक्षोभक रील बनवणाऱ्या हारुणचा पोलिसांनी केला इलाज
  
रुग्णालयात उपचारादरम्यानही काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यावर गो तस्करांनी चाकूने वार केल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्यावर उतरून निदर्शनेही केली आहेत. तसेच काही दुकानांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने आणि पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाधित भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. अशी माहिती पोलिसांना दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0