"भारतात फक्त अल्लाह-हू-अकबर नारा आहे, जो कोणी देणार नाही..."; प्रक्षोभक रील बनवणाऱ्या हारुणचा पोलिसांनी केला इलाज

    16-Jun-2024
Total Views | 99
 Bakrid Reel
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये बकरीदवर प्रक्षोभक रील बनवणे एका तरुणाला महागात पडले. यूपी पोलिसांच्या कारवाईनंतर तो आता तुरुंगात आहे. त्याने सोशल मीडियावर प्रक्षोभक रील पोस्ट केली होती. व्हिडिओमध्ये तो धमक्या देत होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडताच त्याची अक्कल ठिकाणावर आली. यानंतर त्याने माफी मागायला सुरुवात केली आणि आपल्याकडून चूक झाल्याचे सांगू लागला. आरोपी हारुणने सांगितले की, त्याने मित्रांच्या विनंतीवरून हा व्हिडिओ बनवला होता.
 
हे प्रकरण दर्शन बुढाणा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. हा व्हिडिओ शुक्रवार, दि. १४ जून २०२४ चा आहे. आरोपी बरकटा गावचा रहिवासी आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला होता, “ईदवरील सीन गदर चित्रपटापेक्षा मजबूत असेल. जो कोणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करील त्याचे तुकडे तुकडे केले जातील. अल्लाह-हू-अकबर ही घोषणा भारताच्या कानाकोपऱ्यात गुंजेल. मात्र, आता भविष्यात अशी चूक करणार नसल्याचे तो सांगत आहे. या रीलबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तो सांगतो.
 
एसपी (ग्रामीण) आदित्य बन्सल यांनी आवाहन केले की, प्रत्येकाने हा सण परस्पर सामंजस्याने साजरा करावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये. ते म्हणाले की, यूपी पोलिस इंटरनेट मीडियावर देखील पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क आहेत, जर कोणी कोणत्याही प्रकारचा भडकाऊ व्हिडिओ किंवा संदेश पसरवला तर त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाईल. सणांच्या निमित्ताने जातीय सलोखा बिघडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. समाजात तेढ निर्माण करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बकरीद सोमवार, दि. १७ जून २०२४ साजरी केली जाणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121