काँग्रेस नेत्यांना न्यायालयाचा दणका, म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य....!

15 Jun 2024 17:37:59
high court inc leader

 
नवी दिल्ली :      'इंडिया टीव्ही' वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांना रजत शर्मा यांच्याविरोधात केलेले ट्विट काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 'आप की अदालत' या कार्यक्रमाद्वारे प्रसिध्दीस आलेले रजत शर्मा यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.


दरम्यान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खोटे पसरवून कोणाचीही बदनामी करू शकत नाही असे सांगतानाच उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना झटका दिला आहे. तसेच, संपादक रजत शर्मा यांचा व्हिडीओ हटविण्याचे आदेशही कोर्टाने यावेळी दिले आहेत. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी यासाठी तीनही नेत्यांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक खाजगी बनलेले व्हिडिओ न्यायालयीन आदेशाशिवाय सार्वजनिक न करण्याचे आदेश गुगलला देण्यात आले आहेत.





Powered By Sangraha 9.0