मुंबई : उद्धव ठाकरेंना आता उद्धवमिया म्हणतात, अशी टीका भाजपचे जेष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंनी केली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.
नारायण राणे म्हणाले की, "महाविकास आघाडीने दावा केला तरी विधानसभेत आम्हीच निवडणून येणार आहोत. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. जे आडवे आले त्यांच्यावर पाय देऊन आम्ही पुढे जाऊ," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - विधानसभेची निवडणूक मविआ एकत्र लढणार : उद्धव ठाकरे
ते पुढे म्हणाले की, "मला सगळ्यांनीच मतदान केलं. शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांच्या विरोधात होती. मातोश्रीत मुस्लीम लोकांना काय बोलतात ते मला माहिती आहे. आतापर्यंत शिवेसेनेने त्यांना विरोध केला आणि आता शेवटी ते मिया भाई झाले आहेत. आता उद्धव ठाकरेंना उद्धवमिया म्हणातात. कोकणातील मुस्लिम जनता आमच्या सोबत आहे आणि राहतील. भारत एकसंघ राहावा यासाठी कुणीही वेगळे विचार मनात आणू नये," असेही ते म्हणाले.
तसेच "रत्नागिरीच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच रत्नागिरीतील पाण्याचा प्रश्न, रोजगार प्रश्न, विमानतळ वाहतूक सुरु करणे हे प्रश्न आहेत. तर चिपळूणमधील पूर परिस्थिती आणि पर्यटन हे सहाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.