चंद्रपूर : आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला तिकीट न मिळण्यासाठी सुपारी दिली," असा धक्कादायक आरोप चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. राजुरा येथे आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होता. दरम्यान, त्यांचा रोख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरच असल्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.
प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला तिकीट न मिळण्यासाठी सुपारी दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना मला तिकीट मिळू नये यासाठी सुपारी देण्यात आली होती. काहीही करा पण प्रतिभाताईंना तिकीट देऊ नका, असं त्यांना सांगण्यात आलं. जेणेकरून मुनगंटीवार घरी बसून निवडणूक जिंकू शकतील. पण सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्यासोबत राहिले. अनेकांनी त्यांना पैसे देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. पण ते कुणाच्या खोट्या आश्वासनांना विकल्या गेले नाहीत. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला," असे त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का? - महाराष्ट्राच्या राजकारणाते जोकर!
चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी, अशी ईच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केलेत. परंतू, नंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद प्रकर्षाने पुढे आले होते. दरम्यान, धानोरकरांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.