महाराष्ट्राच्या राजकारणाते जोकर!

नितेश राणेंचा राऊतांवर घणाघात

    14-Jun-2024
Total Views |

Thackeray & Raut 
 
मुंबई : उगाच देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातले जोकर बनला आहात याकडे लक्ष द्या, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर केला आहे. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करुन दिली. पण कोविड घोटाळ्यामध्ये संजय राऊतांचे मालक, त्यांचा मुलगा आणि मेव्हणा हे सगळे बरबटले आहेत. त्यामुळे त्या घोटाळ्यांवरही अण्णा हजारेंना लक्ष घालण्याची विनंती करावी लागेल. पदांचा गैरवापर काय असतो हे बघायचं असल्यास अडीच वर्षांचा महाविकास आघाडीचा कार्यकाळ जवळून पाहिल्यानंतर दिसेल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  ठाकरे आणि राऊतांना न्यायालयाने ठोठावला दंड! नेमकं प्रकरण काय?
 
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सल्ले देण्याजोगे तुम्ही एवढे मोठे नाहीत. कारण ज्यावेळी तुम्हाला संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाबद्दल काही सल्ले दिले होते ते तुम्ही किती ऐकले?," असा सवाल त्यांनी केला. तसेच राऊतांनी उगाच देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलू नये. आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा राजकारणाचा जोकर मानतो. जर फडणवीस साहेब खलनायक होते तर तुम्ही हयात हॉटेलमध्ये त्यांना का भेटायला गेलात?तुमच्या मालकाला जेव्हा मातोश्री २ च्या परवानग्या हव्या होत्या, तेव्हा तुम्हाला फडणवीस खलनायक वाटले नाहीत का? त्यामुळे दुसऱ्यांना खलनायक बोलण्याआधी तुम्ही आणि तुमचे मालक महाराष्ट्राच्या राजकारणाचे जोकर बनला आहात, याबद्दल विचार करा," असेही ते म्हणाले.