ठाकरे आणि राऊतांना न्यायालयाने ठोठावला दंड! नेमकं प्रकरण काय?

    14-Jun-2024
Total Views |

Thackeray & Raut 
 
मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी खासदार राहूल शेवाळे यांच्या बदनामीप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
उबाठा गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात राहूल शेवाळेंच्या विरोधात लेख छापल्याने त्यांनी ठाकरे आणि राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. माझगाव दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर आता त्या दोघांना दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय येत्या दहा दिवसांत राहूल शेवाळेंना दंडाची रक्कम देण्याचा आदेशही न्यायालयाने ठाकरे आणि राऊतांना दिला आहे.
 
हे वाचलंत का? -  खासदार निलेश लंके कुख्यात गुंडाच्या भेटीला! सत्कारही स्विकारला
 
दरम्यान, या प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी ठाकरे आणि राऊतांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. तसेच त्या दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.