अहमदनगर : अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी अहमदनगर लोकसभेतून विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात भाजपचे सुजय विखे पाटील होते. दरम्यान, आता विजयानंतर निलेश लंकेंनी एका गुंडाची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
निलेश लंकेंनी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड गजा मारणेची भेट घेतली आहे. गजा मारणेवर खूनाचा गुन्हा दाखल आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तो तुरुंगातही जाऊन आला आहे. त्यानंतर त्याची सुटका झाली होती. मात्र, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आता गजा मारणेची भेट घेतली. याशिवाय त्यांनी त्याच्या हस्ते सत्कारही स्विकारला आहे. त्यामुळे या भेटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.