वर्सोवा खाडीनजीक घडलेल्या दुर्घनास्थळी मुख्यमंत्री शिंदेंची भेट!

14 Jun 2024 18:30:15
 
Eknath Shinde
 
मुंबई : वर्सोवा खाडीनजीक सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव जेसीबीसकट गाडाला गेला. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट दिली असून मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड यांच्या मदतीने बचावकार्य सूरु करण्यात आले.
 
२९ मे रोजी खोदकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली होती. गेल्या काही दिवसांपासून बचावकार्य सुरु असून अद्याप राकेश यादव सापडला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी राकेश यादवच्या कुटूंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटूंबातील एका सदस्याला एलअँडटी कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 
हे वाचलंत का? -  कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीनंतर निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
 
यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार तसेच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय नौदल, सैन्यदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे अधिकारी आपल्या तुकडीसह उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0