पुणे : पुणे अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट पुझे आली आहे. या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याचा न्यायालयातील मुक्काम वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्याला १८ जूनपर्यंत बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात वेदांत अग्रवालने भरधाव वेगात कार चालवत दोन जणांचा बळी घेतला. याप्रकरणी त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्याची कोठडी संपल्याने बुधवारी बाल न्याय मंडळासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली.
हे वाचलंत का? - कोण शेफारलं यावर योग्यवेळी बोलेन : नाना पटोले
याप्रकरणात आरोपीचे आई, वडील आणि आजोबा हे तिघेही सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे आरोपी वेदांतची सुटका केल्यास त्याच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणीही नसल्याने त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असा युक्तीवाद पोलिसांनी केला. तसेच त्याला बालसुधारगृहातच ठेवण्याची मागणीही पोलिसांकडून करण्यात आली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपी वेदांतची कोठडी वाढवली आहे. आरोपी वेदांतला १८ जूनपर्यंत बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.